Posts

महाराष्ट्रातील वन संपदा 2020

Image
सौंदर्य पश्चिम घाटाचं! हिमालयापेक्षाही जुन्या पर्वतरांगा ! जगातील सर्वात दुर्मीळ वन संपदा ! विविध प्राणी आणि पक्षांचं माहेरघर जागतीक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण राज्यातील पर्यावरणाचा आढावा घेणार आहोत मात्र जगाने भारतातील ज्या पश्चिम घाटाची दखल घेतली तो पश्चिम घाट आहे तरी कसा ? उंच-उंच डोंगर...घनादट जंगलं.....विविध प्रकारचे प्राणी , आणि पक्षी ...हजारो प्रकारच्या वनस्पती...ही आहे भारतातील महान भौगोलीक पर्वतश्रृंखला...संयुक्त राष्ट्र संघाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेनं पश्चिम घाटाला दुर्मिळ जागतीक वारसा म्हणून घोषित केलंय... भारताच्या नकाशावर डावीकडं महाराष्ट्र, गुरजरात आणि गोवापासून खाली कन्याकुमारी पर्यंत जाणारी एक रेषा दिसते..ही रेषा म्हणजे पश्चिम घाट असून १६०० किलोमीटर लांबीचा आणि १०० किलोमीटर रुंदीचा हा परिसर आहे...जैव विविधतेनं संपन्न असलेलाहा परिसर जागतिक हॉटस्पॉट म्हणून ओळखला जातो...हिमालय पर्वत रांगापेक्षाही पश्चिम घाट जूना असून भारतातील २४ कोटी जनतेची तहान भागवण्याचं काम पश्चिम घाट वर्षानुवर्षे करत आली आहे.. पश्चिम घाट परिसर मोठ्या प्